narendra modi 
देश

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत PM मोदींचा महाराष्ट्राला सल्ला; ममतादीदींची दांडी

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांचे आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दांडी मारली. ममता बॅनर्जी यांनी बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनुसार, निवडणूक प्रचारासाठी ठरलेल्या काही कार्यक्रमांमुळे त्यांनी बैठकीत उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 28 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढलले आहेत. त्यामुळे यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी बैठक बोलावली. बैठकीत वाढत्या कोरोना संक्रमणाबाबत आढावा घेण्यात आला. 

पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या संबोधनात कोरोना स्थितीचा आढावा घेतला. देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे देशात येऊ पाहणाऱ्या दुसऱ्या लाटेला आपण रोखायला हवं. त्यासाठी आपल्याला काही तत्काळ  आण काही निर्णायक निर्णय घ्यावे लागतील. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आली. आपल्या देशातही कोरोनाचे रुग्ण वाढताहेत. काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलीये. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये पॉझिटिव्हीटी रेट खूप वाढला आहे, असं मोदी म्हणाले. 

देशात सध्या ९६ टक्के लोकांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील अनेक देशांच्या तुलनेत भारतातील मृत्यू दर सर्वात कमी आहे. पण, देशातील अनेक भागात कोरोना चाचण्या घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच काही राज्यांमध्ये लसीकरणाची गती कमी आहे. लसीकरण का कमी होत आहे? आपण निष्काळजीपणा करु शकत नाही. हे चांगले काम दाखवण्याची वेळ आहे. तेलंगणा आणि आंध्रामध्ये १० टक्के लस खराब झाल्या आहेत. यूपीमध्येही हीच परिस्थिती आहे. लस वाया का जात आहेत, राज्याने याचे निरीक्षण करावे. अशा वाईट परिस्थितीत आपण, लस वाया घालवू शकत नाही, असंही मोदी म्हणाले.

ममता बॅनर्जी यांनी नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रचार अभियानाची जोरदार तयारी सुरु आहे. ममता बॅनर्जी यांनी प्रचार सभांचा सपाटा लावला आहे. 10 मार्चला नंदीग्राम जागेवरुन त्यांनी नामांकन भरले आहे. 

एका दुर्घटनेत त्या जखमी झाल्या. त्यांना एसएसकेएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे त्यांच्या पायावर प्लास्टर लावण्यात आले. यासंबंधीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ममता यांनी दुखापत होऊनही प्रचार थांबवलेला नाही.

ममता बॅनर्जी यांच्याशिवाय काँग्रेसची सत्ता असलेले छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही बैठकीला उपस्थिती लावली नाही. त्यांच्या या गैरहजेरी मागिल कारण स्पष्ट झालेलं नाही. छत्तीसगड अशा राज्यांपैकी एक आहे, जेथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ममता बॅनर्जी यांच्या ऐवजी चीफ सेक्रेटरींनी बैठकीला हजेरी लावली. ममतांनी लावलेल्या गैरहजेरीच्या मुद्द्यावरुन पश्चिम बंगालमध्ये वातावरण तापणार आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT